टाटाच्या ‘या’ गाडीने घातला धुमाकूळ; 12 सेकंदात घेणार 100 चा स्पीड

मुंबई :

टाटा मोटर्सने अल्ट्रोज आयटर्बो( Altroz iTurbo) भारतात आणली आहे. या नव्या कारची ह्युंदाई आय 20 टर्बो आणि फोक्सवॅगन पोलोशी टक्कर होणार आहे. अल्ट्रोज आयटर्बोसाठी बुकिंग 14 जानेवारीपासून सुरू होत आहे. अवघ्या 11000 रुपयांत तुम्ही ही गाडी बुक करू शकता. 22 जानेवारी रोजी या गाडीची किंमत जाहीर केली जाईल. टाटा अल्ट्रोज आयटर्बोला नवीन हार्बर ब्लू कलर पर्याय आहे. अल्ट्रोज आयटर्बोमध्ये लेदर ग्रे इंटिरिअर्ससह लेदर सीट आहेत.

या गाडीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीत IRA टेक्नोलाॅजीचा समावेश आहे. ही गाडी हिंग्लिश वाॅइस कमांड वर सुद्धा चालते. हिंग्लिशमध्ये कारला जवळपास 70 कमांड देता येऊ शकतात. ही कार XT, XZ और XZ+ या प्रकारात येईल. अजून एक महत्वाचे फीचर म्हणजे ही कार अवघ्या 12 सेकंदात 100 चा स्पीड घेऊ शकते.

हे आहेत फीचर्स :-

ऑटोमेटिक हेडलॅम्प्स, रेन सेंसिंग वाइपर,ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, 7-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम एप्पल कारप्ले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here