दुसर्‍या बायकोमुळे नाही तर ‘त्या’ गोष्टीमुळे जाऊ शकते मुंडेंची आमदारकी; वाचा या प्रकरणातील नेमका मुद्दा

मुंबई :

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चहुबाजूने अडचण झाली आहे. कारण मुंबईतील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणि स्वत: धनंजय मुंडे यांनी आपले दुसऱ्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध असल्याचं मान्य केले. आता या मुद्दयावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना वकील असीम सरोदे यांनी एक मोठी पोस्ट करत अत्यंत महत्वाचे मुद्द्यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सरोदे यांनी :-

हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करता करता येत नाही. द्विभार्या प्रतिबंधक कायदा 1946 नुसार एक लग्न झालेले असतांना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते.

धनंजय मुंडे यांचे कायदेशीर लग्न झाले आणि त्यांची कायदेशीर पत्नी आहे. त्यांनी दुसरे लग्न केले नाही. ते 2006 पासून एका स्त्री सोबत ‘ विवाहासारख्या ‘ संबंधात राहतात पण ती त्यांची कायदेशीर बायको नाही. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही. आणि एक बायको असतांना दुसऱ्या स्त्रीशी विवाहा-सारखे संबंध ठेवणे याविरोधत एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासरखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते. धनंजय मुंडेंच्या बाबतीत या दोन्ही स्त्रियांची काहीही तक्रार नाही. तसेच निवडणुकीच्या आधी उमेदवाराने जी माहिती माहिती द्यायची असते त्यामध्ये कायदेशीर बायकोची माहिती देणेच आवश्यक आहे. त्याअर्थाने धनंजय मुंडे यांनी बायको बद्दलची माहिती लपविली असे म्हणता येत नाही. पण मुलांची माहिती त्यांनी लपविली आहे. असे खोटे व दिशाभूल करणारे प्रतीज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर दाखल करणे ही गंभीर कायदेशीर चूक आहे. कुणी तक्रार केली तर निवडणूक आयोग याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे लोकप्रतिनिधीत्व म्हणजेच आमदारकी रद्द करू शकते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here