गेंड्याच्या कातडीचे’ म्हणत मुंडेंना दादांनी ‘दिले नैतिकतेचे डोस; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

सध्या महाराष्ट्रात करोना, आरोग्य, शेतीचे प्रश्न किंवा सामाजिक समस्या बनासन गुंडाळून एकमेव मोठा मुद्दा चर्चेत आहे. तो मुद्दा म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचे काय होणार? यावर महाविकास आघाडीचे शिलेदार मुंडेंना संरक्षण देत आहेत. तर भाजप आणि विरोधक त्यांची पिसे काढीत आहेत.

अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी याप्रकरणी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. दादांनी म्हटले आहे की, लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! फेसबुक पेज इमेजमध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, मुंडेंवर असलेले लैंगिक शोषणाचे आरोप लक्षात घेता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अजिबात हक्क नाही.

दादांनी यात लिहिलेय की, भाजप महिला आघाडीने याप्रकरणी मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. भाजप त्याच मागणीसाठी आग्रही आहे. ज्या व्यक्तीवर असे आरोप होतात त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील किंवा महाविकास आघाडीवाले त्यांचा राजीनामा घेतील असे दिसत नाही. तरीही भाजपची राजीनाम्याची मागणी आहे.

संपादन : सचिन पाटील

(11) Facebook

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here