सावधान : ‘तो’ प्रकार ‘ट्राय’ केल्यास होऊ शकते मोठे नुकसान; वाचा महत्वाची बातमी

जमाना बदलला तसा ठगाविण्याचा फंडाही बदलत जात असल्याचे आपण पाहतो. सध्या जमाना मोबाईल आणि इंटरनेट यांचा आहे. या नव्या जमान्यात ठगांनी आपला वेगळा फंडा आणून फसवण्याचे धोरण ठेवले आहे. अशावेळी कोणताही वेगळा आणि अव्यवहार्य पर्याय ‘ट्राय’ न करण्याची गरज आहे.

वाचक मित्र-मैत्रिणींनो, हाही प्रकार असाच आहे. सध्या सगळीकडे फाइव्ह जी या संकल्पनेची चर्चा आहे. अनेक खासगी कंपन्या त्यासाठी ओएफसीचे जाळे विनात आहेत. नव्याने मोबाईल मनोरे उभारले जात आहेत. यात जशी संधी सामान्य जनतेला पैसे कमाविण्याची आहे. त्याच पद्धतीने यात फसवणुकीची संधी काही महाभागांनी साधली आहे. तो प्रकार म्हणजे मोबाईल टॉवर उभारणीसाठी ट्राय या सरकारी संस्थेचे ना हरकत दाखला देण्याची.

याबाबत ट्राय नावाच्या संस्थेने सोशल मिडिया आणि मोबाईलवर मेसेजेस करून असे प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्यांपासून सांभाळून राहण्याचे आवाहन केले आहे. अगदी युट्युबवरही या सरकारी संस्थेने याबाबत जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत.

(188) A Video on Mobile Tower Fraud by TRAI – YouTube

यामध्ये सोशल मिडिया, न्यूजपेपर किंवा इतरत्र जाहिराती प्रसिद्ध करून मासिक मोठे पैसे आणि उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवले जाते. संबंधित मोबाईल किंवा इमेल यावर संपर्क केल्यावर याद्वारे छोटेखानी पैसे मागितले जातात. समवेत कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अशी सर्व कागदपत्रे बनावट असतात.

सध्या अहमदनगर जिल्ह्यासह, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात असे फसवणूक करणाऱ्याचे सापळे जोरात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असले प्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. अनेकांनी याप्रकरणी पोलीस केसेस केलेल्या आहेत. ट्राय नावाच्या संस्थेने याबाबत मेसेजमध्ये म्हटले आहे की, असा प्रकार करीत असल्याच्या बातम्या, फोन, मेसेज किंवा जाहिराती आल्यावर लगोलग स्थानिक पोलिसांकडे तक्रार द्यावी.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here