बर्ड फ्ल्यूचा झटका; चिकनसह खाद्यतेलाच्या मार्केटवरही असा झालाय परिणाम

शेतमाल, पशुसंवर्धन-जोडधंदा आणि अन्नप्रक्रिया हे तिन्ही घटक एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळेच आता देशात आलेल्या बर्ड फ्ल्यू नावाच्या विषाणूचा परिणाम शेतमाल, पोल्ट्री आणि अन्नप्रक्रिया या तिन्ही घटकांवर दिसत आहेत. परिणामी चिकनचे भाव खाली आलेले असतानाच आता खाद्यतेलाचे भावही कमी होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन हा या तिन्ही बाजार घटकांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. अलिकडच्या काळात सोया तेलाच्या किंमती वाढत आहेत, परंतु आता आणखी वाढीची अपेक्षा नाही. याबाबत माहिती देताना एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड रिसर्च) अनुज गुप्ता यांनी म्हटलेय की, बर्ड फ्लू हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. कारण बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उद्योगाकडून सोयाबीनची मागणी कमी होऊ शकते. परिणामी सोयाबीनची मागणी घटल्याने बाजारात भाव कमी होतील. त्यासह खाद्यतेलाचे भावही कमी होतील.

ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या माहितीनुसार 12 जानेवारीला सोया तेलाची (पॅकेज) किंमत 134 रुपये प्रति किलो होती. एका महिन्यापूर्वी 12 डिसेंबर 2020 रोजी त्याची किंमत 131 रुपये प्रतिकिलो होती आणि 12 मार्च 2020 रोजी त्याची किंमत 114 रुपये प्रति किलो होती. एकूण ट्रेंड लक्षात घेता याचे भाव कसे वाढले हे स्पष्ट होते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here