मार्केट लाइव्ह : बाजार जोरात; म्हणून ‘त्या’ शेअरवर ठेवा लक्ष, कारण मुद्दा आहे पैशांचा

आजही भारतीय शेअर बाजारात तेजीची शक्यता व्यक्त होत होती. बाजाराने त्याचाच कौल देत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दिवसभरात सर्वांनी काही शेअरवर लक्ष ठेऊन ट्रेड करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या कंपन्यां न्यूजमध्ये आहेत.

देशांतर्गत शेअर बाजाराने पुन्हा जागतिक पातळीवरच्या विक्रम नोंदविला. आजच्या व्यवसायात सेन्सेक्सने 49750 ची पातळी तोडली आणि विक्रमी पातळी 49776 वर पोहोचली. त्याचबरोबर निफ्टीही पहिल्यांदा 14650 वर पोहोचला आहे. ऑटो आणि मेटल यांच्यात वाढ दिसत आहे. एअरटेल तब्बल 5 टक्क्यांनी वधारला आहे, तर ओएनजीसीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. बजाज ऑटो आणि कोटक बँक यामध्ये कमकुवतपणा आहे. आज आशियाई बाजारातही तेजी आहे.

 त्यानुसार खालील शेअरवर इन्व्हेस्टर नजर लावून असतील :

टाटा एल्क्ससी – मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात डिसेंबर तिमाहीत 477 कोटींची वाढ झाली आहे. याच काळात निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली असून ती 78.8 कोटी वरून 105 कोटी झाली आहे.

हीरो मोटोकॉर्प – कंपनीने निकाराग्वा आणि होंडुरासमध्ये नवीन वितरण भागीदारांची नेमणूक केली. या दोन देशांमध्ये वेगवान विस्ताराची कंपनीची योजना आहे.

टेक महिंद्रा – कंपनी ‘पेमेंट टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ मधील संपूर्ण 100% हिस्सा खरेदी करेल.

भारत केमिकल्स – कंपनीच्या बोर्डाने पेड अप इक्विटीच्या 2.2 % भागभांडवलाच्या शेअर बायबॅकला मान्यता दिली. समभाग 11,500 रुपये प्रति शेअर दराने काढले जातील.

तर, पुढील कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील :

अनेक कंपन्यांचे डिसेंबर तिमाही निकाल बुधवारी जाहीर केले जातील. या कंपन्यांमध्ये इन्फोसिस, विप्रो, 5 पैसे कॅपिटल, सीईएससी, कॅपिटल ट्रेड लिंक्स, जीटीपीएल हॅथवे, राजो इंजिनिअर्स यांचा समावेश आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here