म्हणून बाजारात तेजीचा अंदाज; पहा काय असेल मार्केट ट्रेंड

सध्या भारताची अर्थव्यवस्था रसातळाला असतानाही शेअर बाजारात धूम आहे. आजही असाच तेजीचा अंदाज असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. आशियन शेअर बाजारातील एकूण ट्रेंड लक्षात घेता असा सूर आहे. मात्र, तरीही गुंतवणूकदारांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण करून बाजारात ट्रेड करावा.

बाजारात असलेली तेजीची भावना अजूनही मजबूत आहे. त्यामुळेच बाजार पुन्हा उच्च पातळीवर येण्याची शक्यता आहे. बाजाराची दिशा ठरविण्यात परदेशी मार्केट सिग्नल आणि एफआयआय यांची गुंतवणूकीची भूमिका महत्त्वाची असेल. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी 12 जानेवारीला पुन्हा जोर पकडला आणि बाजार 0.5 टक्क्यांच्या वाढीसह दोन्हीही बंद झाले. दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी पुन्हा वाढीसह नवीन उच्च पातळी गाठली. व्यापार सुरू असताना निफ्टी 14,600 च्या अगदी जवळ होता तर सेन्सेक्सही 45,500 च्या वर बंद झाला आहे.

आशियामध्ये सकाळच्या बाजारात सकारात्मक कल दिसून येतो. तैवान, जपान, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमधील बाजारपेठा हिरव्या रंगात आहेत. काल चीन आणि इंडोनेशियामधील बाजारपेठा वरच्या आकड्यात बंद होत्या. मंगळवारी अमेरिकेची डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज बाउन्ससह बंद झाली. बाजार बंद होताना निर्देशांक 0.19% किंवा 60 अंकांनी वाढला होता. त्याचप्रमाणे, नॅस्डॅक कंपोझिटमधील बदल + 0.28% होता त्यानंतर निर्देशांक 13,072.43 वर पोहोचला.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here