‘योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील’ म्हणत ‘त्या’ काँग्रेस आमदाराने केले योगींचे कौतुक

रायबरेली :

“उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसारखा प्रामाणिक आणि पूजनीय मुख्यमंत्री कदाचित कोणत्या ठिकाणी असेल. योगी आदित्यनाथ यांची अनेक ठिकाणी पूजा केली केली जाते. लोकं त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात”, असे म्हणत काँग्रेस आमदार राकेश सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे राकेश सिंह हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं निवडणूक क्षेत्र असलेल्या रायबरेलीतील आमदार आहेत.

आमदार राकेश सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आमदार राकेश सिंह यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या सतत उठत असतात.  राकेश सिंह हे अद्यापही काँग्रेसमध्येच असले तरी त्यांचे मोठे बंधु प्रताप सिंह हे सध्या भाजपामध्ये आहेत.  त्यामुळे आता राकेश सिंह हेही भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सध्या काँग्रेसकडील पुढारी मंडळी आणि कार्यकर्ते कमी होत चालले आहेत.  नुकताच काँग्रसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राकेश सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

संपादन : स्वप्नील पवार     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here