बापरे… महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचं थैमान; ‘या’ शहरात करणार तब्बल 8 हजार कोंबड्यांची कत्तल

परभणी :

कोरोनाने आधीच हवालदिल झालेल्या मानव जातीसमोर आणखी एक संकट उभा ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोनातून अद्याप लोक सावरले नसताना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. जपानपाठोपाठ भारतातही हा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अशातच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एका पोल्ट्री फार्ममधील जवळपास ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे आता राज्यात जवळपास वीस पोल्ट्री फार्म्समधील 80 हजार कोंबड्याची तर परभणीत 8 हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले गेले आहेत. मुंबई, ठाण्यासह 11 जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. यामुळे 1200 पक्ष्यांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये 1112 कोंबड्या, तर उर्वरितांमध्ये कावळे, कबुतर, बगळे यांचा समावेश आहे.

कोरोनानंतर आता देशात पुन्हा एक जुना रोग डोकं वर काढतो आहे. आता पुन्हा एकदा कोरोनानंतर सुरू झालेला बर्ड फ्लूचा प्रादुर्भावाच्या या नव्या धोक्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता मोठी वाढली आहे. बर्ड फ्लू चे संकट पाहता येत्या दिवसात महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here