मुले न होऊ देण्याचा निर्णयाचे ‘असे’ आहेत परिणाम; वाचा 6 म्हातार्‍या जोडप्यांच्या प्रतिक्रिया

प्रत्येकाची स्वतःची राहण्याची पद्धत आहे, काही लोक लग्नाचे नियोजन अगदी कॉलेजपासूनच करत असतात, तर काही लोक आयुष्यभर लग्न करत नाहीत. काही जोडपी ‘बच्चे दो ही अच्छे’ हे धोरण अवलंबतात.

काही वर्षांपूर्वी काही जोडप्यांनी मुले न होऊ देण्याचा निर्णय घेतला. आज ते म्हातारे आहेत. आज ते सांगत आहेत की, त्यांचा या निर्णयाविषयी त्यांना काय वाटते. 

  1. आज मी आणि माझी पत्नी पन्नाशीत आहोत. मात्र आजवर आम्हा दोघांनाही आम्ही घेतलेल्या निर्णयाचा कुठलाच पश्चाताप नाही. आम्ही आयुष्याची 25-26 वर्षे मजेने आयुष्य जगलो आहोत. मूल असणे ही ज्या तीव्रतेची मानसिकता असते तशीच मूल न होऊ देणे हीसुद्धा त्याच तीव्रतेची मानसिकता असते.
  2. आजही मुले न होऊ देण्याचा निर्णय मला सतावतो. रोज एकदा तरी त्या निर्णयाचे वाईट वाटते. आज मी पन्नाशी ओलांडली आहे. तो खूपच चुकीचा निर्णय होता.
  3. वयाच्या 48 व्या वर्षी मुले नसल्याने आजही मी आणि माझे पती सुखाने जगत आहोत. आम्हाला काहीही केव्हाही करण्याचे स्वातंत्र्य आहे.
  4. आम्हाला मूल व्हावं किंवा पाहिजे असं आम्हाला आजही वाटत नाही. बर्‍याच जणांना मुले नकोशी वाटतात, पन तेव्हा ती झालेली असतात.
  5. आज आम्ही साठीत आहोत. आम्हाला मुले नसल्याचे काहीच वाईट वाटत नाही मात्र नातू नसल्याचे दुख निश्चितच आहे.
  6. मुले नसल्याने पैसे मात्र खूप सेव्ह केले. आणि पुतणे, भाचे हे माझ्या मुलासारखे आहेत. त्यामुळे मूल असावेच, असे काही नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here