चांगला पैसा येऊनही होत नाहीये सेविंग; प्रत्येकानेच लक्षात घ्या पैसा साचवण्याच्या ‘या’ 6 जबरदस्त टिप्स

पैसे कसे कमवायचे हे आजकाल प्रत्येकाला माहित आहे, परंतु पैसे कसे वाचवायचे, कसे सेविंग करायचे हे लोकांना माहित नसते किंवा लक्षात येत नाही. पैसे कमावणे नाही तर पैसे जोडणे ही एक कला आहे. आजचा काळ पाहता आपल्या गाठीशी पैसे असायले हवे हे प्रत्येकाला वाटते. जर आपण अद्याप आपल्या मनात पैसे जोडण्याचा विचार केला नसेल तर आता ते तयार करा. यासाठी, आपल्याला फक्त या काही सोप्या आयडिया लक्षात घ्याव्या लागतील.

  1. पैसे जोडण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक योग्य टारगेट निश्चित करणे. समजा, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आठवड्याला काही पैसे वाचवण्याचे टारगेट ठेवले आहे. त्यानुसार एक संपूर्ण आठवडा घालवा, जेणेकरुन आठवड्याच्या शेवटी आपले टारगेट साध्य होईल. हळूहळू ही रक्कम वाढवत चला.
  2. दररोज 5-10 रुपये साचवून काय होईल, असा तुमचा विचार असल्यास तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण जर तुम्ही रोज काही सुट्टे पैसे एखाद्या भांड्यात ठेवले तर वर्षाच्या अखेरीस तुम्हाला चांगली रक्कम जमा होईल.
  3. बर्‍याच वेळा आपण घरात गरजेची नसलेली वस्तु खरेदी करत असतो. म्हणूनच इथून पुढे बाजारात जाताना फक्त आवश्यक वस्तूंची यादी करा. आणि त्याच खरेदी करून आणा. जेणेकरून बाजारात पैसे कमी आणि योग्य गोष्टींवर खर्च होतात.
  4. एका वर्षात आपल्याला किती आणि कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतात याचा अर्थसंकल्प तयार करा. बजेट चार्ट तयार करून, आपल्याला वर्षभर किती रक्कम खर्च होईल याची कल्पना येईल आणि शेवटी किती रक्कम वाचली जाईल हे देखील कळेल.
  5. बर्‍याचदा जपून ठेवलेले पैसे आपण कशावर ना कशावर खर्च करतो.  पण तसे करू नका. साचेलेले पैसे कुठेही खर्च करू नका. उलट तेच एखाद्या ठिकाणी गुंतवून त्याची वाढ कशी होईल, ते पहा. 
  6. पैशाचा हिशोब करणे महत्वाचे आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी हिशोब करा मग तुम्हाला कळेल की, तुम्ही खर्च केलेले पैसे योग्य प्रकारे खर्च केलेले आहेत की नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here