शानदार लुकसह टोयोटा फॉर्च्यूनर झाली लाँच; कंपनीने केलेत ‘हे’ 4 मोठे बदल

दिल्ली :

भारतात प्रसिद्ध असणारी टोयोटा कंपनीची फॉर्च्यूनर पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसली आहे. नव्या वर्षात नव्या अवतारात ही गाडी आपल्या भेटीला आली आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी फॉर्च्यूनर लाँच झाली आहे. पॉवरफुल फुल साइज SUV Toyota Fortuner ची भारतात सुरुवातीची किंमत २९.९८ लाख रुपये आहे.

कंपनीने 2021 Toyota Fortuner Facelift ला २.७ लीटर पेट्रोल इंजिन सोबत लाँच केले आहे. या एसयूव्हीला मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही ट्रान्समिशन सोबत आणले आहे.

आता आपण जाणून घेवूयात कंपनीने गाडीत किती बदल केले आहेत :-

1)  नवीन एलईडी हेडलॅम्प्स आणि रिवाइज्ड बंपर, नवीन कॉस्मेटिक बदल  तसेच लार्ज मेश पॅटर्न ग्रिलचा वापर

2)  १८ इंच अलॉय व्हील्जचा तसेच स्लिम एलईडी टेल लॅम्प्सचा वापर

3)  ८.० इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले 

4)  ३६० डिग्री कॅमेरा, ९ स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, ८ वे पॉवर अजस्टेबल ड्रायव्हर

असे आहेत इतर फीचर्स :-

  • नवीन फॉर्च्यूनरमध्ये Eco, Normal आणि Sport यासारखे ३ रायडिंग मोड दिले आहेत.
  •  नवीन फॉर्च्यूनर फेसलिफ्ट मध्ये ८.० इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिला आहे. जो स्मार्ट कनेक्टेड फीचर सोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉयड ऑटो सपोर्ट सोबत येते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here