देशातील सर्वात सुरक्षित टॉप 3 कारची लिस्ट आली समोर; वाचा, कोणत्या आहेत त्या आणि काय आहे किंमत

मुंबई :

ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच मारुती सुझुकी एस-प्रेसो ही कार सुरक्षित नसल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. त्यानंतर वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अगदी सामान्य माणसेही आपल्या गाडीला क्रॅश टेस्टमध्ये किती रेटिंग आहे ते चेक करू लागली. आता लोकांना मारुती सुझुकीच्या कोणत्या कारला किती रेटिंग आहे, याची माहिती मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. तसेच सर्वच चारचाकी वापरणारे ग्राहक काळजीपोटीही आपापल्या गाड्यांचे रेटिंग शोधत आहेत.

आता कोणत्या गाडीवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसे उपस्थित करत आहेत. भलेही पैसे जास्त जाऊ द्या पण चांगली रेटिंग असणारी गाडी मिळाली पाहिजे, अशाही चर्चा होऊ लागल्या आहेत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला क्रॅश टेस्टमध्ये जास्त स्टार मिळालेल्या आणि भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरलेल्या 3 गाड्यांविषयी सांगणार आहोत.

  1. टाटाची प्रीमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रॉजला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार मिळाली आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये ड्यूअल एअरबॅग्स, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, EBD सोबत ABS, रियर पार्किंग सेंसर्स, स्पीड वॉर्निंग अलर्ट स्टँडर्ड सारखे फीचर्स दिले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत ५.४४ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

टाटा मोटर्सची एन्ट्री लेवल कार टियागोला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाली आहे.याशिवाय, टाटा टिगोरला सुद्धा क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. टाटाच्या या दोन्ही कारला वयोवृद्ध सुरक्षेसाठी चार आणि छोट्यासाठी ३ स्टार मिळाले आहेत. टाटा टियागोची सुरुवातीची किंमत ४.६० लाख रुपये तर टाटा टिगोरची सुरुवातीची किंमत ५.७५ लाख रुपये आहे.

फोक्सवेगन पोलो स्टारला Global NCAP रेटिंग मध्ये ४ स्टार मिळाले आहेत. चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये ३ स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारमध्ये केवळ ड्रायवर आणि प्रवासी फ्रंटल एअरबॅग मिळणार आहे. या कारची किंमत ५.८३ लाख ते ९.६० लाख रुपये आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here