सर्वोच्च समितीत सरकारचेच सदस्य; पहा नेमका कोणता आक्षेप आहे आंदोलकांचा

भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, या समितीचे सदस्य अप्रत्यक्षपणे सरकारचे लोक आहेत.  त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या भूमिकेमुळे समितीची शिफारसदेखील सरकारच्याच बाजूने येईल. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की समितीने आपला अहवाल 2 महिन्यांत सादर करणे आवश्यक आहे आणि दहा दिवसांच्या आत त्याची पहिली बैठक घ्यावी लागेल.

एकूणच सर्वोच्च समितीमध्ये निवडलेले चारही सदस्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकाचे समर्थक असल्याने ही समिती आता टीकेसाठी पात्र ठरली आहे. नवीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी थांबवून सर्वोच्च न्यायालयाने शेतकर्‍यांशी बोलणीसाठी एक समिती स्थापन केली असली तरीही सरकार आणि आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांमधील संघर्ष संपवण्याची यामुळे अजिबात शक्यता दिसत नाही. कारण आंदोलक शेतकरी संघटनांबरोबरच कॉंग्रेस पक्षानेही समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

खासगी वृत्तवाहिनीवरील संभाषणादरम्यान समिती सदस्यांची नावे घेत टीकेत म्हणाले की, यातील सर्व सदस्य हे यापूर्वीच बाजारपेठ आणि भांडवलशाहीचे समर्थक आहेत. कृषी सुधारणांसाठी असा कायदा आणण्यासाठीची त्यांनी सरकारलाच शिफारस केली होती. मग त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अपेक्षा कशी करता येईल. बी

केयूच्या प्रवक्त्याने सांगितले की, अशोक गुलाटी कोण आहेत? त्यांनी बिल (कृषी बिल) देण्याची शिफारस केली होती. भूपेंद्रसिंग मान हे पंजाबचे आहेत. अमेरिकन बहुराष्ट्रीय यांच्यासमवेत शरद जोशी हे काम करायचे. महाराष्ट्र शेतकरी संघटनेची विचारसरणी बाजारवादी अर्थव्यवस्था व भांडवलशाहीला अनुकूल आहे.

टिकैत येथेच थांबले नाहीत तर ते म्हणाले की, ही समिती सरकारच्याच बाजूने निर्णय देईल असे स्पष्टपणे दिसते. ते म्हणाले की, जी समिती गठीत झाली आहे ती सरकारच्या बाजूने निर्णय देईल. त्यांना आज बोलवा किंवा दहा दिवसानंतर अहवाल द्या. ते सरकारच्या बाजूने निर्णय देतील. त्यात कोणता शेतकरी आहे?

टिकैत यांच्या या आरोपावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, राकेश टिकैत यांनी स्वत: कृषी कायद्याचे समर्थन केले आहे. जून २०२० मध्ये राकेश टिकैत यांनी नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आणि त्यांना शेतकरी हिताचे म्हणून संबोधले होते.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here