बुलेटच्या किमतीत झाला बदल; बुलेटप्रेमींनो, वाचा ही महत्वाची बातमी

मुंबई :

रॉयल एनफील्डच्या बाइक्सची फॅन फॉलोइंग वाढतच आहे. दिवसेंदिवस या बाईक्स अजूनच लोकप्रिय होताना दिसत आहेत. डिसेंबर 2020 मध्ये रॉयल एनफील्ड बाईकच्या एकूण विक्रीत 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान आता बुलेटच्या रॉयल एनफील्ड कंपनीने बुलेटच्या किमतीत बदल केला आहे.

Royal Enfield ची सर्वांत स्वस्त असणारी बाईक बुलेट स्टँडर्ड 350 आता महाग झाली आहे. या बाईकची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. आता 1 लाख 27 हजार 284 रुपयांपासून या गाडीची किंमत असणार आहे.

भारतात रॉयल एनफील्ड कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये  35 टक्के वाढीसह 65492 मोटारसायकली विकल्या. गेल्या महिन्यात कंपनीची निर्यात 82 टक्क्यांनी वाढून 3503 युनिटवर गेली आहे. तर डिसेंबर 2019 मध्ये 1927 बाईकची निर्यात झाली होती.

या बुलेटची किंमत वाढवली असली तरी गाडीत कोणताही बदल केला गेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. Royal Enfield ची बुलेट 350 ही बाईकप्रेमींची आवडती बाईक आहे. परवडणारी आणि टेक्निलकदृष्ट्याही बाईकप्रेंमींसाठी ही बाईक खास आहे. मात्र आता कंपनीने किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने बाईकप्रेमी निराश झाले आहेत.

रॉयल एनफील्ड या कंपनीच्या गाड्या मायलेज कमी देतात. या गाड्यांची किंमतही जास्त असते. तरीही या गाड्यांना भारतात मोठा प्रतिसाद मिळत असतो.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here