सेकंड हँड बाईक/स्कूटर खरेदी करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ टिप्स; होईल मोठा फायदा

सेकंड हँड स्कूटर किंवा बाईकसाठी भारत हे जगातील सर्वाधिक मोठे मार्केट आहे. बर्‍याच लोक त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पहिल्यांदा सेकंड हँड गाडी खरेदी करतात. सुरक्षित प्रवासासाठी लोक प्राधान्याने स्वत:च्या स्कूटर किंवा दुचाकी घेतात. या एकमेव कारणामुळे वापरलेल्या दुचाकी वाहनांची म्हणजेच सेकंड हँड गाड्यांची मागणीही वाढली आहे.

समजा, तुम्हाला स्कूटर किंवा बाईक खरेदी करायची आहे मात्र तुमचे बजेट कमी आहे, तर तुम्हीही कमी खर्चात सेकंड हँड दुचाकी घेऊ शकता. हा एक चांगला पर्याय आहे. या प्रोसेसमध्ये पैसेही वाचतात आणि आपल्याला गाडीही मिळते. सहसा सेकंड हँड बाईक किंवा स्कूटर खरेदी करताना थोडीशी निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्याने भविष्यकाळात अधिक नुकसान होते. म्हणून जेव्हा आपण दुचाकी घेताय तेव्हा आपण काही गोष्टी तपासल्याच पाहिजेत.

या गोष्टी घ्या चेक करून :-

  1. गाडीत कुठूनही ऑइल लीकेज होएत आहे का? हे नक्कीच तपासून घ्या.
  2. गाडीच्या कुठल्या भागात गंज लागला आहे का? हेही तपासून घ्या.
  3. रस्त्याने चालताना एखाद्या वेळी गाडीला इकडून तिकडून धक्का लागू शकतो. त्यामुळे डेंट पडतो. छोटा डेंट असल्यास वेगळी गोष्ट. मात्र मोठा डेंट असल्यास गाडीला नुकसान होऊ शकते. समजा गाडीच्या हँडलच्या भागात ठोकर बसलेली असेल तर गाडी चालवताना फरक पडतो.
  4. इंजिन तपासणी: इंजिनची स्थिती तपासण्यासाठी बाईक सुरू करा. एखाद्या फिटरला बरोबर घेऊन जा.
  5. मायलेज आणि मिटर तपासून घ्या. एखाद्या गाडी जास्त वापर केला असल्यास लगेच लक्षात येते.  
  6. खरेदी किंवा सौदा फायनल होण्यापूर्वी टेस्ट राइड नक्कीच घ्या.

ही कागदपत्रे घ्या तपासून :-

  1. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)
  2. विमा
  3. प्रदूषण प्रमाण पत्र (PUC)

सेकंड हँड वाहनांसाठी नेहमीच विश्वसनीय सेलर्सचा शोध घ्यावा. आजकाल गाडी खरेदी विक्री करण्याची सुविधा डिजिटल प्लॅटफॉर्म देत आहेत. मात्र तिथे फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here