गुलाम ते योद्धा असा प्रवास केलेला अफ़्रीकी अंबर मलिक; वाचा, औरंगाबादच्या स्थापनेची आणि औरंगाबादचा पाया रचणार्‍या ‘या’ योद्ध्याची कहाणी

अनेक परकीय राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. परदेशी घराण्याचे अनेक राजे या भूमीवर जन्मले, राज्य केलेही आणि राजेशाही गमावलीही. इथली माती बर्‍याच राजांच्या उत्कर्षाची साक्ष देते. तर हीच माती अनेक शूर-वीर राजांच्या नेस्तनाबूत झालेल्या साम्राज्याचीही साक्ष देते.

या धरतीवर असेही काही राज्यकर्ते होते जे परदेशी असूनही त्यांनी या मातीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखानुसार ‘मलिक अंबर’ हा देखील एक असाच जबरदस्त योद्धा होता.

आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात आणलेल्या मलिक अंबरची कहाणी अतिशय रंजक आणि वेगळी आहे. तारुण्यात तो अनेकदा विकला गेला आणि नशिबाने त्याला इथिओपियातील घरापासून दूर आणले. गुलाम ते योद्धा असा प्रवास करणार्‍या अंबरने हिंदुस्थानात फक्त स्वातंत्र्य मिळवले नाही तर मोठे सैन्य उभे केले आणि एक शहरही स्थापित केले. आज आपण या शहराला औरंगाबाद म्हणून ओळखतो.

इतिहासकारांच्या मते, अंबरचा जन्म इ.स. 1545 मध्ये इथिओपियाच्या खंबाटा प्रदेशातील ओरोमा ट्राइबमध्ये झाला होता. आज या देशातील 35 टक्के लोकसंख्या ओरोमा जमातीची आहे. गुलामांना पकडण्यापूर्वी अंबरचे नाव ‘चप्पू’ होते. इतिहासकार म्हणतात की एकतर अंबर युद्धात बंदिवान होता किंवा त्याच्या आई-वडिलांनी गरिबीमुळे त्याला विकले असावे.

अंबरला मध्य आशियातील बाजारात नेले गेला. तिथे त्याला अरबांनी विकत घेतले. तो बर्‍याच वेळा खरीदी केला गेला आणि विकलासुद्धा गेला. इतिहासकार रिचर्ड डॉ. एम. ईटन यांनी आपल्या  A Social History of the Deccan, 1300-1761 Eight Indian Lives या पुस्तकात लिहिले आहे की, ‘चप्पू’ येमेनमधील डच गिल्डर्समध्ये विकला गेला. तेथून त्याला बगदादमध्ये नेण्यात आले. जेथे एका व्यावसायिकाने चप्पूची क्षमता ओळखली आणि त्याला शिक्षण दिले, नंतर त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि त्याचे नाव ‘अंबर’ ठेवले.

अंबरला 1570 च्या दशकात दक्कन (दक्षिण भारत) येथे आणण्यात आले. येथे चंगेज खानने त्याला विकत घेतले, खान स्वतः गुलाम होता आणि अहमदनगरच्या निजाम शाहीचा पेशवा (मुख्यमंत्री) होता. खानने या अंबरसह एक हजार ‘हबशी’ विकत घेतले. त्या काळी हे हबशी त्यांच्या प्रामाणिकपणा, ताक़दीसाठी प्रसिध्द होते. त्यांना सैन्य दलातही समाविष्ट केले जायचे.

मालकाच्या मृत्यूनंतर हबशीना मुक्त केले जायचे. नंतर ते एखाद्या साम्राज्यात जाऊन आपली सेवा द्यायचे. खानच्या मृत्यूनंतर काही हब्शी स्वत: शक्तिशाली योद्धा बनले आणि असाच एक हब्शी होता अंबर.

अंबरने 5 वर्षे चंगेज खानसाठी काम केले आणि त्यानंतर खान मरण पावला, अंबरला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर अंबरने विजापूरच्या सुलतानसाठी 20 वर्षे काम केले. विजापूरमध्ये, अंबरला एका लहान सैन्य तुकडीची जबाबदारी देण्यात आली आणि त्याला ‘मलिक’ टोपणनाव मिळाले.

1595 मध्ये अंबर अहमदनगर सुलतानाकडे परत गेला. हाच काळ होता जेव्हा मुघल शासक अकबराची नजर दक्कनवर होती आणि आता अकबर अहमदनगरच्या दिशेने वाटचाल करू लागला होता. इतिहासकारांच्या मते ही अकबरची शेवटची मोहीम होती.

अंबरने तिच्या मुलीचे लग्न अहमदनगरमधील राजघराण्यातील वंशजांशी लावून दिले.

पिल्लई यांच्या पुस्तकानुसार अंबरने आवश्यकतेनुसार शक्ती आणि बुद्धिमत्ता वापरली. एक काळ असा होता की पश्चिम दक्कनची निजाम शाही ही अंबरची जमीन म्हणून ओळखली जायची.

मोगलांनी अहमदनगर सुलतान ताब्यात घेतला, परंतु आजूबाजूचा परिसर अजूनही बंडखोरी करत होता आणि या बंडाचे नेतृत्व अंबर करत होता.

अंबर हा फक्त योद्धा नसून एक कुशल राज्यकर्ता देखील होता.1610  मध्ये जेव्हा मोगलांनी अहमदनगर ताब्यात घेतला तेव्हा अंबरने सल्तनतसाठी एक नवीन राजधानी स्थापित केली, त्या शहराचे नाव खिरकी (औरंगाबाद) होते.

मराठ्यांसह 2 लाखाहून अधिक लोक या शहरात राहू लागले. या शहरात कालवे बांधले गेले. पिल्लईच्या म्हणण्यानुसार, औरंगाबादमध्ये अंबरनेच जामा मस्जिद आणि काली मशिदीची निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ‘शिवभारत’ या महाकाव्यातही अंबरचा उल्लेख केला आहे आणि सूर्यासारखा वीर म्हणून त्याचे वर्णन केले आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी हे अंबरच्या जवळचे होते. 1626 मध्ये अंबरचा मृत्यू झाला आणि त्यांची समाधी खुलबादमध्ये उभारली गेली. अंबरच्या निधनानंतर जहांगीर यांचे आत्मचरित्र लिहिणारे मुफ्ताम खान यांनी लिहिले की, “युद्ध कौशल्य, न्याय, शासन करणारा अंबरसारखा कोणीच नव्हता.” औरंगजेबाने 17 व्या शतकात या शहराचे नाव औरंगाबाद ठेवले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here