अण्णांच्या राळेगणमध्ये राजस्थानचे श्यामबाबाही; दोन गटात होत आहे सरपंचपदासाठी लढत

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे गाव अवघ्या जगाला परिचयाचे आहे. फ़क़्त 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या छोटेखानी गावाला जागतिक ओळख दिली आहे ती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी. त्यांच्याच गावाचे यादवबाबा मंदिर म्हणजे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान. मात्र, यंदा निवडणुकीत यादवबाबा यांच्यासह राजस्थान राज्यातील  श्री श्यामबाबांची प्रतिमाही चर्चेचा विषय आहे.

कारण, यंदा तिसरा आणि वेगळा पर्याय म्हणून बिनविरोध निवडणुकीला विरोध करीत लोकशाही प्रक्रियेचा आग्रह धरणाऱ्या किसन पठारे यांनी थेट राजस्थानहून श्री श्यामबाबांची प्रतिमा मागवून घेतली आहे. पठारे यांनी पॅनललाही श्यामबाबांचे नाव दिले आहे. एकूणच दोन्ही पॅनल अण्णांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवत असल्याचे सांगत मतदारांना साद घालीत आहेत.

तीन वेळा उपसरपंंच आणि एकदा सरपंच राहिलेल्या जयसिंगराव मापारी यांच्या विरोधात मागील निवडणुकीत लढलेल्या लाभेश औटी यांनीच यंदा मापारी गटाशी हातमिळवणी केली आहे. दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक करण्याची हाक दिली होती. अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी याबाबत मार्गदर्शन केले होते. पत्र, पठारे गटाने यंदा लोकशाहीचा आग्रह धरून मापारी-औटी गटाला कडवे आव्हान उभे केले आहे.

अशा पद्धतीने गावात सध्या या गावात निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. यंदाच्या मतमोजणीनंतर गावात कोणाला सरपंच होण्याची संधी मिळणार हे स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गट आपणच विजयाचे दावेदार असल्याचे सांगत मतदान मागताना दिसत आहेत.

संपादन : संतोष वाघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here