धक्कादायक : वाघ, सिंहानंतर ‘या’ प्राण्यालाही कोरोनाने घेरले

न्युयॉर्क :

कोरोनाचा प्रकोप कमी झाला असे वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तो वाढतच आहे. लोकांनी कोरोनाला गांभीर्याने घेणे कमी केले आहे. असे असले तरी जगभरात कोरोनाचा नवा प्रकार स्ट्रेन हा धुमाकूळ घालत आहे. आता अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाघ, सिंहानंतर आता गोरिलाला कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे.

यात विशेष बाब म्हणजे काही कर्मचाऱ्यांकडून गोरिलाला कोरोना झाल्याचे समजत आहे. प्राणी संग्रहालयातील काम करणारे काही कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह सापडले होते. हे कर्मचारी सातत्याने गोरीलाच्या संपर्कात होते. त्यामुळे अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालयातील दोन गोरिलाचे रिपोर्ट चाचणीनंतर कोरोना पॉझिटिव्ह आले तर तिसऱ्या गोरिलामध्ये कोरोनाची सर्व लक्षणे आढळून आली.

की खोकला आणि श्वासोच्छवासाच्या समस्या या दोन्ही गोरिलांमध्ये आढळून आली होती. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे, अशी माहिती सफारी पार्कचे कार्यकारी संचालक लिसा पीटरसन यांनी दिली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here