‘सिग्नल’चा कर्ता-धर्ता कोण, असा प्रश्न पडलाय ना; मग वाचा महत्वाची माहिती

सध्या आभासी जगामध्ये इन्स्टंट मेसेजिंग अॅपचे ट्रेड वॉर चालू आहे. त्याला कारण ठरले आहे व्हाटस्अॅपचे 2021 चे नवीन गोपनीयता धोरणा. त्यामुळे सध्या अॅप स्टोअरवर टेलीग्राम आणि सिग्नल या दोन्ही अॅप्लिकेशनची धूम आहे. त्यातही व्हाटस्अॅपप्रमाणेच सोपे असणारे सिग्नल जोरात आहे.

त्यामुळे हे सिग्नल नेमके आहे कोणत्या कंपनीचे, देशाचे आणि याचा मालक कोण असेही प्रश्न अनेकांना पडत आहेत. युझर्स याचो माहिती गुगल करून पाहत आहेत. तर, मित्र-मैत्रिणींनो, आज आपण याच सिग्नलचा कर्ता-धर्ता कोण यावर फोकस करूयात.

ब्रायन अ‍ॅक्टन हा आवलिया आहे का तुम्हाला माहित? नाही ना? तो आहे व्हॉटअपचा सह-संस्थापक. परंतु, नंतर त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपची विक्री झाली आणि फेसबुकने ते विकत घेतले. अवघे जग मुठीत घेणाऱ्या सर्वांनी मग व्हॉट्सअ‍ॅपमार्फत आपले जाळे विणण्यास सुरुअव्त केली. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांना सांगितले आहे की त्यांचा डेटा फेसबुकवर शेअर केला जाईल आणि त्यासाठी त्यांना अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या या उपक्रमावर वापरकर्ते खूपच चिडले आहेत. त्याचा झटका व्हॉट्सअ‍ॅपला बसलेला आहे.

अलिकडच्या काळात मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टेलिग्रामचीही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. तथापि, टेलिग्रामपेक्षा सिग्नलकडे अधिक लक्ष दिले जात आहे, कारण त्यात व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच मेसेजिंग, व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग तसेच स्टिकर्स सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here