व्हाटस्अॅपला रेड ‘सिग्नल’; इंडियन झटका जोरात, गोपनीयता धोरणाचे युझर्सनी असे घातले लोणचे

नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेकांच्या रडारवर आलेल्या व्हाटस्अॅपला झटका देण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत व्हाटस्अॅप वापरतानाच इतर पर्याय घेऊन ठेवण्याच्या मुद्द्यामुळे सध्या सिग्नल आणि टेलीग्राम या दोन्ही मोबाईल मेसेजिंग अॅप्लिकेशनचे डाऊनलोडिंग वाढले आहेत.

2021 च्या नवीन गोपनीयता धोरणामुळे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपला खूप त्रास होत आहे आणि जगभरातील लोक या अ‍ॅपचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. डेटा सुरक्षिततेच्या विरोधात व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी 2021 मधील अटी व शर्ती सांगत भारतातील हजारो लोकांनी हे मेसेजिंग अॅप मोबाईलमधून काढण्यास सुरुवात केली आहे आणि त्याऐवजी सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अॅप्सचा उपयोग प्रमुखपणे सुरू केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून सिग्नल आणि टेलिग्रामसह इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सवर स्थलांतरित झाले आहेत कोंव होण्याच्या तयारीत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे वापराकार्त्यांमध्ये मोठा बदल झालेला स्पष्ट दिसत आहे. आता अॅपल व प्ले स्टोअरवरील डाऊनलोडमध्ये सिग्नलने व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. सिग्नलने फ़क़्त 48 तासांत हे मोठे यश संपादन केले.

व्हॉट्सअॅपविरूद्ध लोकांमध्ये तीव्र नाराजी वाढत आहे. युझर्स एक नवा व चांगला पर्याय शोधत आहेत. अशावेळी सिग्नल असा दावा करतो की त्याच्या प्लॅटफॉर्मची जाहिरात विनामूल्य असून ती गोपनीयतेच्या बाबतीत अगदी योग्य आणि वापरण्यास सुलभ आहे. त्याचा परिणाम म्हणून प्ले स्टोअरवर ते सध्या चौथ्या नंबरवर आलेले आहेत. लवकरच त्यांचा पहिल्या नंबरवर येण्याचा मानस असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here