बर्ड फ्ल्यू केअर : पोल्ट्रीमध्ये ‘ही’ काळजी घेण्याची आहे गरज; वाचा आरोग्यासाठी महत्वाची माहिती

बर्ड फ्ल्‍यू प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी  राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचेही पालन करण्याच्या सूचना अहमदनगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले दिल्या आहेत. 

सरकारने म्हटले आहे की, अचानक मोठ्या प्रमाणावर उद्भवणारी पक्षांची मर्तुक त्‍वरीत वरिष्‍ठ कार्यालयास / आयुक्‍तालयास कळवावी. क्षेत्रीय स्‍तरावरील अधिकार्‍यांनी त्याबाबत दक्ष राहावे. सर्व शेतकरी / पशुपालकांनी बर्ड फ्ल्‍यू रोगाची लक्षणे पक्ष्यांमध्ये आढळल्‍यास नजिकच्‍या पशुवैद्यकिय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. पशुवैद्यकिय कर्मचार्‍यांनी रोजच्या तसेच आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी. संशयीत क्षेत्रावरून पक्षांची वाहतुक / ने-आण पूर्णपणे बंद करावी. उघड्या कत्‍तलखान्‍यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. अशा कत्‍तलखान्‍यातुन पक्षी परत येणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. 

या रोगाचे जंतू इतर प्राण्यांमध्येसंक्रमीत होणार नाहीत अशा प्रकारची जैवसुरक्षा यंत्रणा असणे अत्‍यावयश्‍क आहे. रोग प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लागणारे साहित्‍य, उपकरणे, रसायने आदीबाबत पूर्वतयारी ठेवावी. मास्‍क, निर्जंतुके, रसायने आदींची उपलब्‍धता करुन ठेवणे व अशा वस्‍तुंच्‍या उपलब्‍धतेसंबंधी आवयश्‍क बाबींची पुर्तता करुन ठेवणे. तसेच या वस्‍तु आवयश्‍क वेळी अविरतपणे कशा उपलब्‍ध होतील या विषयीची माहिती कायमपणे ठेवण्‍यात यावी. सन 2015 च्‍या सर्वेलन्‍स प्‍लॅननुसार व्‍यापक बर्ड फ्ल्‍यू सर्वेक्षण मोहीम सुरू ठेवावी. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी आवश्यक कार्यवाहीबाबत अधिकची माहिती (www.dahd.nic.in) या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. जेथे पोल्‍ट्री फार्मस आहेत तेथे आवश्‍यकतेनुसार याबाबतची कार्यवाही करावी.

फक्‍त शासकीय नव्‍हे तर खाजगी पोल्‍ट्री फार्मसवरसुध्‍दा याबाबत खबरदारी घेणे आवयश्यक आहे. प्रत्‍येक गावांतील ग्रामपंचायतीने धुण्‍याचा सोडा (Na2CO3 सोडियम कार्बोनेट) यांचे 1 लिटर पाण्‍यामध्‍ये 7 ग्राम याप्रमाणे द्रावण तयार करुन कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावांतील गटारे, नाल्‍या, पशुपक्ष्‍यांचा वापर असलेल्‍या भिंती व जमिनीवर तात्‍काळ फवारणी करावी. पुन्हा दर 15 दिवसाच्‍या अंतराने 3 वेळेस फवारणी करावी. यामुळे विषाणू, जिवाणू, माश्‍या, गोचीड आदींचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होईल. सर्वेक्षणासाठीचे रोगनमुने नियमितपणे प्रयोगशाळेस पाठवावेत. बाहेरून येणारे अर्थात स्थलांतरित (पाहुणे) पक्षी यांचा बर्ड फ्ल्‍यू रोगाच्‍या प्रसारामध्‍ये महत्‍वाची भुमिका बजावत असल्‍याने ते ज्‍या भागात भेट देतात त्‍या भागामध्‍ये व्‍यापक, नियमित व वारंवार सर्वेक्षण मोहिमा राबवावी, अशा मार्गदर्शक सूचनांची तात्काळ अंमलबजाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत. 

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here