बर्ड फ्लू अपडेट : पहा कोणत्या राज्यांमध्ये झालीय या विषाणूची खात्री; पोल्ट्रीवर संकट

देशभरात पोल्ट्री व्यवसायावर पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यू नावाचे संकट कोसळले आहे. वास्तविक एकही मानवी रुग्ण सापडलेला नसताना खबरदारीचा उपाय म्हणून दहा राज्यांमध्ये कार्यवाही सुरू झालेली आहे.

देशात बर्ड फ्लूचा धोका दररोज वाढत आहे. आता बर्ड फ्लू देशातील 10 राज्यात पसरला आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांमध्ये सरकारने अलर्ट जारी केलेला आहे.

सरकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत बदक आणि कावळे यांचे 8 नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. या सर्व नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. राजधानी दिल्लीतील 15 उद्यानात 91 कावळे आणि 27 बदके मृत सापडली आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर संजय लेक परिसराला अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ANI on Twitter: “Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to chair a meeting to review the bird flu situation in the state, today. (File pic) https://t.co/dKeIHqfywj” / Twitter

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरंबा गावात बर्ड फ्लूमुळे 900 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकार सक्रीय झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील बर्ड फ्लूच्या सद्यस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविली आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरंबा गावच्या एक किलोमीटरच्या आत सर्व पोल्ट्रीमधील पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह 10 किमीच्या आत येणा सर्व कुक्कुटपालन पक्ष्यांच्या खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने या गावाला संसर्गग्रस्त विभाग म्हणून घोषित केले असून गावातील सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यातील पोंग डॅम वन्यजीव अभयारण्यात २१5 प्रवासी पक्षी मृत आढळले आहेत.

एकूणच देशभरात आता अनेक ठिकाणी पक्षी बर्ड फ्ल्यू विषाणूने ग्रस्त आढळत असल्याने देशभरात खबरदारी घेतली जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here