WHO ने घातला घोळ: भारतापासून वेगळे दाखवले ‘हे’ महत्वाचे राज्य; ‘या’ देशाचा असू शकतो हात

दिल्ली :

काही दिवसांपूर्वी शंघाई सहयोग संगठन (एससीओ अर्थात SCO) यांच्या बैठकीत पाकिस्तानने भारताची खोडी काढण्यासाठी म्हणून एक काल्पनिक आणि बनावट नकाशा सदर केला होता. त्यानंतर ट्विटरनेही नकाशात घोळ घातला होता. आता अजून एक असाच प्रकार थेट WHO कडून घडला आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने एक नकाशा लोकांसमोर आणला होता. ज्यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा रंगीत नकाशा जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अजूनही तो हटविण्यात आलेला नाही.

असा आहे प्रकार :-

कोरोनाविषयी सातत्याने WHO अपडेट देत आहे. सध्या जागतिक स्तरावर कोणत्या देशात कोरोनाचे किती रुग्ण आढळून आले आहेत आणि कोरोनामुळे कोणत्या देशात किती मृत्यू झाले आहेत, याविषयीची माहिती नकाशाच्या माध्यमातून WHOने दिली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलेला आहे. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला आहे.

दरम्यान आता या प्रकरणात चीनचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यांनी पहिल्यांदा ही बाब लक्षात आणून दिली ते पंकज यांनी सांगितले की,  हा नकाशा सर्वप्रथम पाहिला तेव्हा जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भूभाग भारतापासून वेगळा दाखवल्यामुळे ही हैराण झालो. यामागे चीनचा हात असू शकेल. कारण चीनकडून WHO ला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जाते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here