‘ते’ कारण आले व्हाट्सअपच्या अंगलट; बसला मोठा धक्का, ‘या’ नव्या मेसेजिंग अॅपची वाढली क्रेज

दिल्ली :

सध्या व्हाट्सअपच्या नवीन धोरणांची जगभरात चर्चा चालू आहे. Whatsapp कडून बुधवारी युजर्संना पॉप अप मेसेज पाठवले आहे. यात युजर्संना नियम व अटी सोबत नवीन प्रायव्हसी संबधी सांगितले आहे. नवीन नियम ८ फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. ग्राहकांना देव मानणारे व्हाट्सअप हे समाजमाध्यम आता काही असे नियम लागू करणार आहे, जिथे ग्राहकांच्या हिताचा विचार केला जाण्याची शक्यता कमी दिसत आहे. या नव्या धोरणास आपण स्वीकारले नाही तर आपल्याला व्हाट्सअप वापरता येणार नाही.

एका बाजूला आपल्या गोपनीयतेचा प्रश्न असल्याने काही लोक हे नवीन धोरण स्वीकारतीलही मात्र आता व्हाट्सअपला दूसरा एका पर्याय उभा राहिला आहे. विशेष बाब म्हणजे हा पर्याय  अधिक सुरक्षित असल्याचे म्हणत या पर्यायी एपला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

सध्या सिग्नल मेसेंजरला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संघ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिग्नल मेसेंजर वर व्हेरीफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाइडलाइन जारी केली आहे.  टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन अॅलन मस्क यांनी गुरुवारी नवीन युजर्सला सिग्नल जोडण्याचे आवाहन केले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here