मुंबई, पुणे नाही तर ‘या’ शहराने भरला मास्क न घालण्यासाठी तब्बल 75 लाखांचा दंड; त्यातही झाला मोठा घोळ

औरंगाबाद :

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. मात्र आता लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीयेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून लोकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र आता मास्क वापरला नाही म्हणून लोक चौकाचौकात दंड भरताना दिसत आहेत.

दरम्यान एका शहरात मास्क वापरला नाही म्हणून लोकांकडून तब्बल 75 लाख रुपये दंड म्हणून वसूल केले गेले आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर बंधनकारक लोकांनी या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेणे सोडले आहे. जाणून आश्चर्य वाटले की यात पुणे आणि मुंबई नसून एका तिसर्‍याच शहराने नकोशी बाजी मारली आहे. पालिकेने मास्क न लावणाऱ्यावर 500 रुपये दंड लावण्यास सुरुवात केली होती. औरंगाबाद महापालिकेने 8 महिन्यात 14 हजार 96 नागरिकांकडून तब्बल 70 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मात्र या सगळ्या प्रकरणात एक मोठा घोळ झाला आहे. कोरोनाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी असे म्हटले होते की, मास्क न वापरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसुल करण्यात येईल, व त्यांना त्याबद्दल मास्क देण्यात येईल.

दरम्यान गेले 8 महीने दंड तर वसूल झाला मात्र नागरिकांना कोणत्याही प्रकारचे मास्क मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here