भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या ‘त्या’ कारने रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड; आता होणार शानदार लुकसह अजून स्पोर्टी; येणार लिमिटेड एडिशन

जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स आणि कमी पैशात मिळणार्‍या कार म्हणजे मारुती सुझूकीच्या. आजही सामान्य भारतीय माणसांच्या मनावर गारुड घालणारी कंपनी म्हणून मारुती सुझूकीचं नाव तोंडी येतं.  आधी मारुती 800 या गाडीने सर्वाधिक खपाचा रेकॉर्ड केला होता. काही काळाने मारुती अल्टोने हा रेकॉर्ड मोडला. आता 2020 मध्ये देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कारचा रेकॉर्ड स्विफ्टच्या नावे झाला आहे. 

मारुतीच्या ऑल्टोचा आधीच्या सर्वात जास्त विक्रीचा रेकॉर्ड स्विफ्टने आता मोडला आहे. गेल्या १५ वर्षात याआधी हा कारनामा स्विफ्टच्या सिडान मॉडल डिझायरने २०१८ मध्ये केला होता. 

कंपनीनेही आजवर कारमध्ये चांगले बदल करून लोकांसमोर आणल्याने या कारची मार्केटमधील हवा अजूनच वाढली. आता भारतीयांच्या पसंतीस उतरलेली स्विफ्ट शानदार लुकसह अजून स्पोर्टी होत आपल्या भेटीला येणार आहे. या नव्या स्विफ्टच्या एडिशन या लिमिटेड असतील.

असे असतील फीचर्स :-

  • कारमध्ये लो स्लंग स्टांसचा वापर केला आहे.
  • कारमध्ये ऑल ब्लॅक फिनिशचा वापर केला आहे.
  • ब्लॅक फिनिश ग्रिल पर्यंत वापर केल्याने या एडिशनचा लूक आणखी स्पोर्टी वाटत आहे. तसेच ब्लॅक बॉडी किटचा वापर केलाय.
  • स्टँडर्ड व्हेरियंटची तुलनेत लिमिटेड एडिशन मॉडल जास्त बोल्ड आणि डायनामिक लूक सोबत येते. कारला स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनीने ऑल ब्लॅक डॉमिनेंट थीमचा वापर केला आहे.
  • एअरोडायनामिक स्पॉइलर, बॉडी साइड मोल्डिंग, डोर वाहजर, ऑल ब्लॅक गार्निश ग्रिल, टेल लँम्प आणि फॉग लॅम्प दिले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here