शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : रिलायन्सच्या धान खरेदीवर वाचा दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया

आम्ही हमीभाव असलेल्या शेतमाल खरेदीच्या व्यवहारात अजिबात नाहीत, आणि भविष्यात कंपनीचा असा मानस नसल्याचे पंजाब-हरियाणा कोर्टात रिलायंस कंपनीने म्हटलेले असतानाच कर्नाटक राज्यात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव देऊन खरेदीला सुरुवात केली आहे. त्यावर मार्केटमधून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

याबाबत बोलताना एसएफपीसी या मध्यस्थ (दलाल) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिकार्जुन वालकलादिनी म्हणाले की, तृतीय पक्ष हा गोदामात ठेवलेल्या धान्याच्या गुणवत्तेची चाचणी घेईल. एकदा दर्जेदार मला मिळाल्याचे समाधान मिळाल्यानंतर रिलायन्सचे एजंट पीक उपलब्ध करुन देतील. गोदामात सध्या 500 क्विंटल धान (तांदूळ) भांडार आहे. खरेदीनंतर रिलायन्स एसएफपीसीला पैसे ऑनलाईन देईल, जे नंतर थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल. धान वाहून नेणाऱ्या वाहनाना जीपीएस मशीनद्वारे ट्रॅक करण्यात येणार आहे.

तर, याबाबत कर्नाटक राज्य असोसिएशनचे अध्यक्ष चमारसा मलिपाटील म्हणाले आहेत की, कॉर्पोरेट कंपन्या आधी एमएसपीपेक्षा अधिक भाव देऊन शेतकऱ्यांना आमिष दाखवतील. यामुळे एपीएमसी देणाऱ्या बाजार समित्या मोडीत निघतील. मग नंतर खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट कंपन्यांचा जुलूम सुरू होईल. आपण या प्रकारच्या युक्तीने होणारी फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here