दिल्ली :
आपण गायीविषयी किती माहिती ठेवता? आपल्याला गाईविषयी किती माहिती आहे? हेच लक्षात घेऊन आता 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. आश्चर्य वाटले न? होय, हे खरोखर होणार आहे.
देशी गायी आणि त्यापासून मिळणार्या फायद्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय कामधेनु आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. ही परीक्षा 25 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. ‘गौ विज्ञान प्रसार परीक्षा’ असे या परीक्षेचे नाव आहे.
असे राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरीया यांनी सांगितले की, या परीक्षेत भाग घेणार्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकही या परीक्षेत सहभागी होऊ शकतील. या परीक्षेत गायीशी संबंधित 100 पर्यायी प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न हिंदी आणि इंग्रजीसह 12 स्थानिक भाषांमध्ये असतील. यासाठी उमेदवारांना 1 तासाचा कालावधी देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 6 फेब्रुवारी 2019 रोजी ‘राष्ट्रीय कामधेनु आयोग’ ची स्थापना केली. हे कमिशन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रालयांतर्गत आहे. ‘राष्ट्रीय कामधेनु कमिशन’ चे मुख्य कार्य म्हणजे गोवंश हत्या बंद करणे, तसेच विविध जातीच्या प्राण्यांचे संवर्धन करणे आणि गायीच्या उपयुक्ततेच्या प्रसारावर कार्य करणे हे आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस
- राज्यातील ‘या’ शहरात घडली घटना : लसीकरणानंतर तीन परिचारिकांना त्रास; थेट आयसीयूमध्ये केले दाखल
- आता काँग्रेसही झाली आक्रमक; ‘मांडीला मांडी लावून बसलेले’ म्हणत ‘त्यांच्यावर’ साधला निशाणा
- आता घराचे स्वप्न होणार साकार; ‘या’ बँका देत आहेत सर्वात स्वस्त लोन