रिलायन्सने केले ‘त्या’ शेतकऱ्यांचे भले; पहा किती भाव दिलाय तांदळाला..!

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी शेतमाल खरेदी-विक्रीत अजिबात सक्रीय नसल्याचे पंजाब-हरियाणा हाय कोर्टात म्हणत असतानाच या कंपनीने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तांदळाची खरेदी केल्याची बातमीही आली आहे. त्यानुसार हमीभावापेक्षा जास्त दराने त्यांनी तांदूळ खरेदी केल्याचे नवभारत टाईम्स यांनी बातमीत म्हंटले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन जोरात चालू असतानाच ही वेगळी बातमी आलेली आहे.

कर्नाटकातील एपीएमसी कायद्यात दुरुस्तीनंतर, मोठी कॉर्पोरेट कंपनी आणि शेतकरी यांच्यात हा पहिलाच मोठा करार घडला आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडने रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एक हजार क्विंटल सोना मन्सुरी धान खरेदी करण्याचा करार केला आहे. त्यांनी धानाला 1950 रुपये क्विंटल भावाचा करार केला आहे. त्याचेवेळी MSP फ़क़्त 1868 रुपये आहे.

रिलायन्सच्या नोंदणीकृत एजंटांनी पंधरवड्यापूर्वी एसएफपीसी फार्मर्स प्रॉडक्शन कंपनी यांच्याबरोबर करार केला. पूर्वी फक्त तेलाच्या उत्पादनांचा व्यापार करणार्‍या कंपनीने आता धान खरेदी-विक्री सुरू केली आहे. त्यांच्यकडे सुमारे 1100 धान उत्पादक शेतकरी नोंदणीकृत आहेत. रिलायन्स रिटेलच्या करारानुसार पिकाला 16 टक्के पेक्षा कमी ओलावा गरजेचा आहे. क्वालिटी बेस्ट असलेल्या तांदळाला त्यांच्याकडून चांगल्या भावात खरेदी केले जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here