आली ‘ती’ही अर्थसाह्य योजना; स्कीमचा लाभ घेण्यासाठी तुम्ही असायला हवेत..

‘अरुंधती’ आणि ‘मैत्रेयी’ असे या दोन योजना कर्नाटक राज्य ब्राह्मण विकास मंडळाने जाहीर केलेल्या आहेत. या दोन्ही योजना ब्राह्मण समाजातील मुलींसाठी सुरु केल्या आहेत. या दोन योजनांतर्गत ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ब्राह्मण समाजाने या योजनेचे स्वागत केले आहे.

भाजपने महाराष्ट्रात सत्तेवर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ब्राह्मण समाजातील पूजाअर्चा करणाऱ्या सर्वांना बेरोजगार भत्ता म्हणून 6 हजार रुपये प्रतिमाह देण्याची स्कीम आणली होती. ती योजना राज्यात चालू आहे. आता त्या पद्धतीने कर्नाटक राज्यात ब्राह्मण मुलींसाठी विशेष योजना आणली गेली आहे.

‘अरुंधती’ योजनेतंर्गत ब्राह्मण समाजातील वधूंना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ‘मैत्रेयी’ योजनेतंर्गत कर्नाटकातील पुजाऱ्यासोबत विवाह करणाऱ्या ब्राह्मण मुलीला तीन लाख रुपयांचा बाँड मिळेल. मुलगी आणि मुलाचा हा पहिला विवाह असला पाहिजे. वधुच्या कुटुंबाला ती आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल असे नियम आणि अटी यासाठी असतील याची माहिती मंडळाचे अध्यक्ष एच.एस.सचिदानंद मुर्ती यांनी सांगितले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here