मोदी सरकारची ऐतिहासिक कामगिरी; वर्षभरात उतरवला सव्वातीन कोटी महिलांच्या डोक्यावरील हंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ऐतिहासिक कामगिरी करण्यात कुठेही मागे नसते. आताही त्यांच्या सरकारने जे मागील 70 वर्षात जमले नाही असे दिव्य कार्य केले आहे. फ़क़्त वर्षभरात त्यांनी 70 वर्षातील कामगिरीला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. मागील वर्षात देशभरात 3.4 कोटी ग्रामीण घरांना पाण्याचे कनेक्शन देण्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

स्वतंत्र्यापासून आजपर्यत 18.93 कोटी घरांपैकी 3.23 कोटी घरांना पाण्याचे कानेक्शन देण्यात आले होते. परंतु भाजप सरकारने एका वर्षात राष्ट्रीय जल जीवन अभियानांतर्गत देशभरात 3.4 कोटी ग्रामीण घरांना पाण्याचे कनेक्शन दिले असून बंद नळीतून पाणीपुरवठा केला आहे, अशी माहिती केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिली आहे.

गोवा राज्यात अभियानाने आघाडी घेतली असून तेथे ते 100 टक्के पूर्ण झाले आहे. 66210 गावांत हर घर जल योजना सफल झाली आहे. योजना सफल करणारा हरियाणातील कुरुक्षेत्र हा देशातील 27 वा आणि राज्यातील तिसरा ठरला आहे. याशिवाय तेलंगणा, गुजराथ, हरियाणा, पांडेंचेरी अभियानाचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ पोचले आहेत. हिमाचल, बिहार, उत्तराखण्ड, मणिपूर, मिझोराम, अंदमान निकोबार येथे वेगाने काम सुरु आहे, अशी माहिती द फोकस इंडिया या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here