दिल्लीसह देशातील काही राज्यांमध्ये मेलेल्या पक्षांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणू आढळल्याच्या बातम्या आहेत. मात्र, अजूनही पोल्ट्रीमध्ये हा विषाणू शक्यतो कुठेही सापडलेला नाही. मात्र, तरीही देशभरात अंडी आणि चिकन यांच्या व्यवसायावर याचे दुष्परिणाम दिसण्यास सुरुवात झालेली आहे.
बर्ड फ्लूमुळे दिल्लीमध्ये सुप्त भीतीदायक परिस्थिती आहे. दिल्लीकरांनी अंडी आणि कोंबडी खाणे टाळण्यास सुरवात केली आहे. त्याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. दिल्लीत दहा दिवसांत अंडी आणि कोंबडीच्या खरेदीत मोठी घट झाली आहे.
कोंबडी कापून विकणाऱ्या दुकानदाराने सांगितले की बर्ड फ्लूमुळे गेल्या 3-4 दिवसांपासून कोणतीही कमाई होत नाही. पूर्वी आम्ही दररोज 8-10 हजार रुपये इतका धंदा व्हायचा आता फक्त 2 ते 3 हजार रुपये धंदा होत आहे.
बर्ड फ्लूचा धोका देशभर वाढला आहे. त्याचबरोबर बर्ड फ्लूसंदर्भात 5 राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी बर्ड फ्लू दिल्लीत येऊ लागला आहे. कारण अचानक दिल्लीत 100 कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. यामुळे दिल्लीत बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. दिल्लीच्या मयूर विहारमधील एका उद्यानात बरेच कावळे मृत अवस्थेत सापडले आहेत.
द्वारका आणि उत्तम नगरमध्येही अनेक कावळे मृत सापडले आहेत. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बर्ड फ्लूबाबत आता दिल्ली सरकार कडक नियंत्रण आणत आहे. तिन्ही ठिकाणाहून नमुने घेतले असून त्यांना तपासासाठी पाठविले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यावरून दाखल झालेल्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने नमुने भरल्यानंतर प्रमाणित प्रक्रियेअंतर्गत मृत पक्ष्यांना माती पुरले आहे.
संपादन : सचिन पाटील
- ‘आदर्शगाव’ हिवरेबाजारचा निकाल जाहीर; ‘पद्मश्री’ पोपटराव पवारांच्या पॅनलची ‘अशी’ आहे अवस्था
- ‘बच्चो का बाजार’मध्ये इतकी आहे मुलींना किंमत; पहा पोलिसांनी नेमके काय उघडकीस आणलेय ते
- महाराष्ट्रातील ‘महत्वाच्या’ ग्रामपंचायतीचा निकाल हाती; सत्तेत असणार्या ‘या’ पक्षाने मारली बाजी तर दुसर्या पक्षाचा सुपडासाफ
- आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळख असलेल्या ‘त्या’ ठिकाणी अशी आहे परिस्थिती; थेट बारामतीकरांचे आहे लक्ष
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांना धक्का; तालुक्यात भाजपने मारली बाजी, वाचा संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक निकाल