कंत्राटी शेतीबाबत अदानी कंपनीने जाहीर केली भूमिका; दिला तो महत्वाचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी सुधारणा विधेयक मोठ्या घाईत आणि संसदेच्या गदारोळात मंजूर करून घेतले. त्यानंतर लगेचच एक कंपनी चर्चेत आली. ती होती सुप्रसिद्ध उद्योगपती आणि मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांची.

कारण, अदानी ग्रुपची अदानी अॅग्री लॉजिस्टिक्स लिमिटेड ही कंपनी शेतमाल खरेदी, साठवण आणि वाहतूक यामध्ये उतरणार असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले होते. अगदी कंपनीने काही ठिकाणी साठवणूक आणि वितरण यावरील जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, त्यामुळे शेतकरी आंदोलकांच्या रडारवर सध्या ही कंपनी आहे.

त्यामुळे अदानी ग्रुपने आपली भूमिका जाहीर केली आहे. नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनांकडून सुरू असलेल्या विरोधामुळे अदानी समूहाची कंपनी अदानी अ‍ॅग्री लॉजिस्टिकने स्पष्टीकरण दिले आहे की कंपनी थेट शेतकर्‍यांकडून धान्य खरेदी करत नाही, ना कंत्राटी शेती कंपनीचा मानस आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here