लॉकडाऊनचा झटका : 8.43 लाख लोक परतले; 5.52 लाखांच्या गेल्यात नोकऱ्या, पहा कुठे आहे ‘ही’ परिस्थिती

लोकसंख्या नियंत्रण असो की साक्षरता आणि उच्चशिक्षण. यामध्ये भारतात केरळ राज्य अव्वल आहे. त्याच राज्यात माहितीचे संकलन सर्वात चांगले होत असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. याच देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुंदर अशा केरळ राज्याला करोनाचा मोठा झटका बसला आहे. त्याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्यासह देशभरातील याचे आकडे भारत सरकारकडे उपलब्ध नसल्याने लोकांची काय परिस्थिती आहे याचाच मेळ समजेनासा झालेला आहे.

देश-विदेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा झाल्यावर अनेकांचे आरोग्य बिघडले तर काहींचे आयुष्य कोलमडले आहे. केरळच्या सरकारी आकडेवारीनुसार, २०२० च्या मे महिना ते जानेवारी, २०२१ या कालावधीत सुमारे 8.43 लाख लोक परदेशातून केरळमध्ये परतले आहेत. यातील 5.52 लाख लोकांनी नोकर्‍या गेल्याने परत आल्याचे कारण दिले आहे.

म्हणजेच कोरोना विषाणूच्या साथीमुळे परदेशात नोकरी गमावून केरळला परतलेल्या 5.52 लाख लोकांपैकी 1.40 लाख लोक फ़क़्त पहिल्या एका महिन्यात मायदेशी परतले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार केरळमध्ये परत आलेल्या 2.08 लाख लोकांनी आपल्या देशात परत येण्याचे कारण, नोकरीचा व्हिसा कालबाह्य होण्याचे कारण आणि इतर कारणे दिली आहेत.

साथीच्या आजारामुळे नोकरीचे संकट वाढत असल्याचे या सरकारची आकडेवारी सांगते. यामुळे केरळच्या अर्थव्यवस्थेला बराच काळ याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आखाती देशांमधून केरळला पाठविल्या जात असलेल्या पैशांवर अवलंबून असलेले घर, व्यवसाय आणि व्यवस्था यावर याचा वाईट परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here