बँकचे कर्ज मिळवणे म्हणजे महादिव्य काम. ज्यांना काही खास कामासाठी कर्ज पाहिजे त्यांना न देता फसवणूक करणाऱ्यांना सहजपणे बँका कर्ज देताना आपण पाहतो. मात्र, आता आपणास पर्सनल लोन हवे असल्यास फ़क़्त दोन मिनिटात मिळू शकते.
होय, ही सेवा पेटीएम Pay TM या मोबाईल अॅप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवरील लोकांसाठी तत्काळ वैयक्तिक कर्ज सुविधा सुरू केली आहे. ही सेवा वर्षभर 24X7 उपलब्ध असेल, ज्यात सुट्ट्या आणि शनिवार-रविवार यांचा समावेश असेल. कर्ज मिळायला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागेल. कर्ज फेडण्यासाठी १८ ते ३६ महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यानुसार ईएमआयचे मूल्यांकन केले जाते.
पात्र ग्राहक फायनान्शियल सर्व्हिसेस पर्यायाअंतर्गत ‘पर्सनल लोन’ टॅबद्वारे या सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि पेटीएम अॅपद्वारे त्यांच्या कर्ज खात्याचे थेट व्यवस्थापन करू शकतात. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने अनेक एनबीएफसी आणि बँकांशी करार केला आहे.
पगारदार, छोटे व्यावसायिक आणि व्यावसायिकांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळेल. पेटीएमने एका निवेदनात म्हटले आहे की, बीटा फेजदरम्यान चारशेहून अधिक निवडक ग्राहकांना वैयक्तिक कर्जवितरित केले आहे. या आर्थिक वर्षात आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 1 लाखांहून अधिक वापरकर्त्यांना वैयक्तिक कर्ज देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
पेटीएम लेंडिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता म्हणाले की, स्वयंरोजगाराला तत्काळ वैयक्तिक कर्ज देणे हे त्यांचे ध्येय आहे. यामुळे अल्प ते मध्यम मुदतीच्या वैयक्तिक कर्जाची गरज असलेल्या तरुण व्यावसायिकांना कर्ज दिले जाणार आहे.
संपादन : सचिन पाटील
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने