ट्रम्प यांना झटका; ट्विटरसह फेसबुक, इन्स्टानेही केली कारवाई

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे काही आपली खुर्ची सहजपणे सोडतील असे दिसत नाही. समर्थकांना पेटवून आणखी काही दिवस खुर्चीवर बसण्याचा त्यांचा खेळ सोशल मीडियामध्ये सुरू आहे. त्यामुळे ट्विटरसह फेसबुक, इन्स्टानेही त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ट्विटरने त्यांचे अफवांना उधाण देणाऱ्या पोस्ट डिलीट करतानाच 12 तासांसाठी ब्लॉक केले आहे. ट्विटरच्या या कारवाईनंतर फेसबुक, इन्स्टानेही मग त्यांच्यावर 24 तासांची कारवाई केली आहे. या कालावधीत त्यांचे खाते सस्पेंड करण्याचा मोठा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here