UP मध्ये निर्दयपणाचा कळस; पोलिसांनीही दाखवली निष्ठुरता; वाचा ‘निर्भया’ची बातमी

देशभरात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणाबाबत सोशल मिडीयामध्ये कितीही संतप्त प्रतिक्रिया येत असल्या तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. त्यात पोलिसांची निष्ठुरता अशा प्रकरणांना कशी जबाबदार आहे याचा प्रत्यय देणारी घटना उत्तरप्रदेश राज्यात घडली आहे.

उत्तर प्रदेशातील बदाउन जिल्ह्यातील मंदिरात पूजा करणाऱ्या एका महिलेसोबत अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. खासगी भागात लोखंडी रॉड टाकून महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्या महिलेचा मृतदेह १७ तासांहून अधिक काळ तिच्या घराबाहेर पडलेला होता. गावकरी संतापले तेव्हा पोलिसांनी कारवाई केली. तब्बल ४८ तासांनी मृतदेहाचे पोस्टमार्टेम कारण्याची धक्कादायक कर्तव्यदक्षता यावेळी पोलिसांनी दाखवली आहे.

आरोपींमध्ये मंदिराच्या महंतासह आणखी तिघांचा समावेश आहे. मृत पिडीत महिला ही अंगणवाडी सेविका असून तिचे वय ५० वर्षे आहे. मंदिरात उपस्थित असलेले महंत सत्यनारायण, शिष्य वेराम आणि ड्रायव्हर जसपाल यांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे.

महिलेचा मृतदेह १७ तासांहून अधिक काळ घराबाहेर पडलेला होता. त्यावेळी विहिरीत पडून महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलीस म्हणत होते. अखेरीस गावकऱ्यांच्या दबावानंतर पोलिसांनी कार्यवाहीस सुरुवात केल्याचे माध्यमांनी म्हटलेले आहे.

४ जानेवारीला गुन्हा दाखल करूनही महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले नाही. घटनेनंतर सुमारे ४८ तासांनी पोस्टमॉर्टेम ५ जानेवारीला झाले. 

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here