म्हणून ‘अलीबाबा’च्या गुहेतच गायब झालेत जॅक मा; वाचा पडद्यामागचे खरे कारण

डेटा हा आता सामन्यांच्या परवलीचा शब्द झालेला आहे. याच डेटा अर्थात माहितीच्या आधारावर युद्ध लढणे, जिंकणे, कंपन्या मोठ्या करणे, एखाद्याला उद्धवस्त करणे आणि राजकीय लढाया जिंकणे याचे प्रयत्न चालू असतात. डेटा हे नव्या जगाचे दुधारी हत्यार आहे. तेच ‘अलिबाबा’वाले जॅक मा यांच्या गायब होण्याचे खरे कारण आहे.

वॉल स्ट्रीट जनरल या अमेरिकी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अलिबाबाच्या संस्थापकासाठी संपत्ती असलेला ग्राहकांचा डेटा जॅक मा यांनी द्यावा अशी चिनी कम्युनिस्ट सरकारची इच्छा होती. मात्र, त्याला मा यांनी नकार दिल्याने मग पुढे अनेक घडामोडी घडून मा थेट अलीबाबाच्या गुहेत गायब करण्याची किमया चीनी सरकारने केली आहे.

जॅक मा आपल्या अलिपे अॅपच्या माध्यमातून लोकांना कर्ज पुरवत असे आणि संपूर्ण कर्ज बँकांचे असताना मध्यस्थ म्हणून पैसे कमवत असे. सुमारे ५० कोटी लोक हे अॅप वापरतात. जॅक मा यांच्याकडे त्यांच्या सवयी, कर्जाच्या प्रवृत्ती आणि कर्जाची परतफेड यांची संपूर्ण माहिती आहे. तीच बँक नियामाकांना हवी होती. अलिबाबा ग्रुपने ती माहिती न दिल्याच्या कारणाने या सर्व घडामोडी घडत आहेत.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅक मा यांना बिझनेस मॉडेलचा फायदा होत होता, पण त्यामुळे चीनच्या वित्तीय व्यवस्थेला धोका निर्माण झाला असता. त्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी जॅक माचे बिझनेस मॉडेल बदलण्याचा प्रयत्न केला आणि डेटावरील त्यांची मक्तेदारी मोडायची होती. जॅक मा सध्या नजरकैदेत आहेत आणि यांना त्यांच्या अलिबाबा गटाविरुद्ध सुरू असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत चीनमधून बाहेर न जाण्यास सांगण्यात आले.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here