म्हणून अदानी-अंबानी शेतकऱ्यांच्या रडारवर; पहा यांच्या कंपन्या नेमके काय करतात ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकामुळे रिलायंस आणि अदानी या दोन्ही बिजनेस ग्रुपला मोठा फायदा होणार आहे. मोदींनी त्या दोन कंपन्यांच्या हितासाठीच हे नवे कायदे आणले आहेत, असे आरोप देशभरातून होत आहेत. त्यावर या दोन्ही ग्रुपच्या मालकांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.

आपण शेतकरी आंदोलनातील आरोपांची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेऊन निर्णय घेऊ शकता. रिलायंस समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी शेतकरी आंदोलकांच्या या आरोपांचे खंडन केले आहे. कृषी सुधारणा कायदे आणि कंपन्यांचे कामकाज व नफेखोरी याचा काहीही संबंध नसल्याचे सांगतानाच कंपनी शेतकरी हितासाठी कर्तव्यरत असल्याचे दावे अदानी-अंबानी यांनी केलेले आहेत.

मागील पाच-सहा वर्षांमध्ये या दोन्ही उद्योगपतींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. अदानी यांचे विमान मोदींच्या सभांच्या ठिकाणी वेळोवेळी दिसलेले आहे. तर, अदानी यांच्याप्रमाणेच अंबानीही मोदींचे व गृहमंत्री अमित शाह यांचे मित्र असल्याचे म्हटले जाते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ याचीच साक्ष देतात.

यातील अंबानी यांची रिलायंस फ्रेश, रिटेल आणि इतर काही कंपन्या थेट शेतकऱ्यांशी निगडीत शेतमाल खरेदी-विक्री यामध्ये आहेत. तर अदानी ग्रुपच्या फोर्च्युन या ब्रांडच्या फूड प्रोडक्टसाठी शेतमाल लागतो. तसेच नुकतीच कायदे मंजूर होण्यापूर्वी स्थापन झालेली अदानी अॅग्री लॉजिस्टिक ही कंपनी लाखो टन शेतमाल स्टोरेज आणि खरेदी-विक्री यात कार्यरत असणार आहे.

अशा पद्धतीने दोन्ही ग्रुपने थेट या कायद्याचा लाभ मिळण्याचा दावा केलेला असतानाही त्यांच्या कंपन्या शेतकरी आणि शेतमाल यांच्याशी निगडीत व्यवसायात आहेत. मग त्यांचा यातून थेट लाभ होणार असल्याचे दिसत असल्याचे दाखवून आंदोलकांनी या दोन्ही उद्योजकांना लक्ष्य केलेले आहे. मात्र, त्यांनी आपली बांधिलकी शेतकऱ्यांच्या प्रती असल्याचे केंद्र सरकारप्रमाणेच जाहीर केलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here