करोना कालावधीतच भारतावर ‘हे’ही मोठे संकट; पहा 8 राज्यांमध्ये कोणता विषाणू पसरतोय..!

दिल्ली :

सध्या करोना विषाणू यामुळे होणारा कोविड 19 आजार आणि त्यावरील लस याचीच चर्चा सुरू आहे. त्याचवेळी चिंता वाढवणारी बातमीही येत असल्याने देशभरातील किमान 8 राज्यांमध्ये विशेष सतर्कतेच्या सूचना देऊन कार्यवाही सुरू झालेली आहे.

या नव्या संकटाचे नाव आहे बर्ड फ्यू. होय, तोच विषाणू ज्यामुळे लाखो कोंबड्या कत्तल कराव्या लागतात तोच हा भयंकर विषाणू. साध्य देशभरातील अनेक राज्यांमध्ये पक्षी मृत आढळत आहेत. अशा सर्वच ठिकाणी प्रवाशी पक्षांची संख्याही मोठी आहे. मग इतर राज्यांमध्येही बर्ड फ्ल्यू प्रसारण करणारा H5N1 हा विषाणू आढळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश येथे पक्ष्यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी एच५एन८ असलेला विषाणू कावळ्यात आढळला आहे. हे विषाणू अगदी संसर्गजन्य आहेत. हा विषाणू सहसा पक्ष्यांमध्ये आढळतो. तज्ज्ञांच्या मते, पक्ष्यांनी हा विषाणू मानवांमध्ये आणल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीपण, प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. हा विषाणू स्थलांतरित पक्ष्यांकडून संक्रमित होतो. सध्या भारतात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठी आहे.

विषाणूचा संसर्ग अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकते. जर H5N1 विषाणू उत्परिवर्तन करत असेल तर तो मानवांपर्यंत सहज पणे पसरू शकतो. मानवांमध्ये सर्दी, सर्दी, श्वासोच्छ्वासाचा अभाव आणि वारंवार उलट्या अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय स्नायूदुखी, जुलाब आणि छातीत दुखू शकते.

राजस्थान, मध्य प्रदेशनंतर हिमाचल प्रदेश, केरळ येथेही पक्षी मेलेले आढळल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बर्ड फ्लूमुळे बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि कर्नाटकातही सतर्कता बाळगली जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here