‘या’ दिग्गज कंपनीच्या इलेक्ट्रिक कारचा धमाका; एकदा चार्ज केल्यावर जाणार तब्बल 500 किलोमीटर, वाचा फीचर्स

मुंबई :

प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी लोकांचा ओढा इलेक्ट्रिक गाड्यांकडे असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. सध्या शहरसह ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक गाड्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. अशातच ऑटो क्षेत्रातील मोठी बातमी समोर आली आहे. ऑटो क्षेत्रातील आघाडीची कंपनी हयुंदाई एक अशी इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे. जी एकदा चार्ज केल्यावर तब्बल 500 किलोमीटर चालणार आहे.

ह्युंदाई कारसाठी खास बनविलेल्या या प्लॅटफॉर्मवरील डेव्हलप कारची बॅटरी रेंज प्रचंड असेल आणि लोक एका चार्जिंगमध्ये 500 किमी पर्यंत या कार चालवू शकतील. तसेच, त्याची बॅटरी देखील जलद चार्ज करण्यात सक्षम होईल. केवळ 18 मिनिटांत 80 टक्क्यांहून अधिक चार्ज होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. तसेच, 100 किलोमीटर जाण्यासाठी बॅटरी फक्त 5 मिनिटांत चार्ज होऊ शकते.

2021 च्या सुरुवातीस दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई मोटर्स ग्रुपचे अध्यक्ष युईसन चुंग यांनी कंपनीच्या या योजनेविषयी सांगितले की, येणार्‍या काही वर्षांत इको-फ्रेंडली कार बनविण्यावर जोर देण्यात येईल आणि त्याच प्रयत्नात इलेक्ट्रिक कारदेखील सुरू केल्या जातील. ह्युंदाईने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्म ई-जीएमपी (इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म) लाँच केले आहे, ज्यावर इलेक्ट्रिक कार डेव्हलप केल्या जातील.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here