सुब्रह्मण्यम स्वामींनी दिला मोदी सरकारला घराचा आहेर; वास्तवाचे भान देताना म्हटले ‘हे’

देशात शेतकरी आंदोलन सुरू असताना, देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली असताना आणि सीमेवर तणाव असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करोना लस आल्याचा उत्सव साजरा करीत आहे. अशावेळी मोदींना वास्तवाचे भान देण्याचे काम भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी केले आहे.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, कोरोना लसीच्या उत्साहात देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे हे आपण विसरता कामा नये. त्याचवेळी आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की लडाखमधील चार हजार चौरस किलोमीटर च्या क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे.

ट्विटरवर मनीष सिंग या युजरने मोदी सरकारच्या 5 वर्षांच्या कार्याची आणि काँग्रेसच्या 60 वर्षांच्या कामाची तुलना करणारा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर वास्तवाचे भान देण्याचा डोस देताना सुब्रह्मण्यम स्वामींनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

(2) Subramanian Swamy on Twitter: “In all this excitements of Vaccine don’t forget the economy collapsing and China gobbling up at least 4000 sq kms in Ladakh” / Twitter

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आमच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी एलएसीजवळ ३० आधुनिक रणगाडे उभारले आहेत. एवढं सगळं असूनही कोरोना लसीच्या उत्साहाची काळजी घेतली जात नाही.

लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य परस्पर नियंत्रणरेषेवर आहे हे सांगण्यासाठी चीनने एलएसीजवळील हवाई तळ मजबूत केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन एलएसीजवळील आपल्या हवाई तळावरपायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे. आपल्या लढाऊ विमानासाठी नवीन हँगर बांधत आहे आणि लायटिंग सिस्टीममध्येही सुधारणा होत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here