’Just Do It’ या टॅगलाइनमुळे ‘Nike’ला मिळाले प्रचंड यश; ही टॅगलाइन होती एका हत्याकांडातून प्रेरित, वाचा यामागची रंजक माहिती

अ‍ॅथलेटिक कपडे आणि बूट यांचा सर्वात मोठे निर्माता कंपनी ‘नायके(Nike)’ ही जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड आहे. १९७१ साली पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी कॅरोलिन डेव्हिडसन यांनी नाईकचा प्रसिद्ध लोगो फक्त 35 डॉलर्समध्ये बनविला होता. आता आदर्श लोगो आणि ‘Just Do It’ या टॅगलाइनसह नायकेने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या ब्रँडशी संबंधित बर्‍याच गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. परंतु आज आम्ही आपल्याला या ब्रँडशी संबंधित एका अशा सत्याबद्दल सांगत आहोत, हे जाणून घेतल्यावर तुम्ही शॉक व्हाल.

‘Just Do It’ ही संकल्पना कोठे आणि कशी आली याचा विचार केला आहे का? नाही, ना. एडवरटाइज़िंग एजन्सी विडेन केनेडीचे सहसंस्थापक डॅन वायडेन यांनी दीझन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “जस्ट डू इट” ही टॅगलाइन एका खुनापासून म्हणजेच मोठ्या हत्याकांडापासून प्रेरित आहे. ही घटना 1977 ची आहे. गॅरी गिलमोर नावाच्या किलरने युटाच्या पोर्टलँडमध्ये बर्‍याच लोकांना ठार केले. नंतर त्याला अटक केली गेली, त्यांना तुरूंगात पाठवलं गेलं.

अखेर फाशी देण्याच्या वेळी त्याला विचारण्यात आले की, मरण्यापूर्वी तुला काहीतरी सांगायचे आहे का?,तेव्हा त्याने उत्तर दिले की ‘Let’s do this’. कंपनीला टॅगलाइन देताना मला त्या व्यक्तीच्या शेवटच्या शब्दांची आठवण झाली, पण ‘Let’s do this’ हे मला आवडले नाही. म्हणून मी ते बदलून  ‘Just do it’ असे केले आणि या टॅगलाइनमुळे कंपनी खूप लोकप्रिय झाली.

खरोखर ‘Nike’च्या यशाचे रहस्य खूप मनोरंजक आहे. यावरून पुन्हा एकदा हे सिद्ध होते की, प्रत्येक यशस्वी गोष्टीमागे एक कटु सत्य नक्कीच लपलेले असते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here