आमदार लंकेच्या प्रयत्नांना झटका; अण्णा हजारे यांच्या गावातही ‘बिनविरोध’ नाही..!

लोकशाहीचा पाया रचणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सामंजस्य ठेऊन आणि सगळ्यांना स्थान देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली होती. मात्र, त्यांनी ‘बिनविरोध’साठी प्रयत्न केलेल्या अनेक ग्रामपंचायतमध्ये अखेरच्या क्षणी सगळे फिस्कटून निवडणुका होत आहेत.

अगदी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावातही निवडणूक होत आहे. आमदार लंके यांनी दणक्यात ही निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध होणार अशीच परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अखेरच्या क्षणी सत्तेच्या वाट्यावरून कुरुबुरी झाल्याने आमदार लंके यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.

हजारे यांच्या गावातील दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तर, इतर सात जागांवर मतदान होणार आहे. अनिल नामदेव मापारी आणि स्नेहल महेश फटांगरे या दोन्हींना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here