‘हे’ पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका; दैनंदिन आयुष्यात येतात खाण्यात

अनेकदा आपण गडबडीत किंवा माहितीअभावी विरुद्ध अन्न एकत्र खातो. त्याचा थेट संबंध आपल्या पोटाशी, पचनक्रीयेशी येतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. अनेकदा फूड पॉईजन होण्याची सुद्धा शक्यता असते.

१) खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, खरबूज, मूळा या गोष्टी दही सोबत खाऊ नका.

२) थंड दूध, थंड पाणी, मद्य तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकते.

३) दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात.

४) दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

५) मूळा, खरबूज, तूप, द्राक्षे, पाणी आणि गरम पाणी मधानंतर घेऊ नका.

६) फणस खाल्यानंतर पान खाणे धोक्याचे ठरते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here