‘या’ 4 गोष्टी नियमित खा; कायमच तंदुरुस्त राहा

आपण तंदुरुस्त असावे असे कुणाला वाटत नाही. पण तंदुरुस्त असण्यासाठी काही गोष्टी आहारात असणे गरजेचे आहे. त्यातही प्रामुख्याने हरभरा,मूग ही कडधान्य भिजवून खावी. भिजवून खालेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आज आम्ही सांगणार आहोत की कुठले भिजवून खाल्लेले पदार्थ हे तुम्हाला तंदुरुस्त ठेवतात.

१) मेथीचे दाणे भिजवून सकाळी खाल्ले तर मधुमेहाच्या रुग्णांना ते खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यासह आतडेही साफ होतात. मेथीचे दाणे खाल्ल्याने पाळीच्या काळात होत असलेल्या वेदना कमी होण्यासाठी फायदा होतो.

२) खसखस भिजवून सकाळी गरम पाण्यासोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

३) मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. अॅसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते. तसेच अशक्तपणा, मूत्रपिंडातील दगडही बरा होतो.

४) अळशी रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे सेवन केल्यास हृदयासंबंधीचे बहुतांश आजार दूर होण्यास मदत होते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here