अजूनही नाही कमी झाली ‘या’ शानदार आणि भन्नाट बाइकची क्रेझ; डिसेंबरमध्ये वाढली 37% विक्री

दिल्ली :

रॉयल एनफील्डच्या बाइक्सची फॅन फॉलोइंग वाढतच आहे. दिवसेंदिवस या बाईक्स अजूनच लोकप्रिय होताना दिसत आहेत. डिसेंबर 2020 मध्ये रॉयल एनफील्ड बाईकच्या एकूण विक्रीत 37 टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार रॉयल एनफील्डने डिसेंबर 2020 मध्ये एकूण 68995 बाइक्सची विक्री केली. त्याच वेळी, डिसेंबर 2019 मध्ये कंपनीने 50416 बाइक्स विकल्या.

निवेदनात म्हटले आहे की, भारतातात कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये  35 टक्के वाढीसह 65492 मोटारसायकली विकल्या. गेल्या महिन्यात कंपनीची निर्यात 82 टक्क्यांनी वाढून 3503 युनिटवर गेली आहे. तर डिसेंबर 2019 मध्ये 1927 बाईकची निर्यात झाली होती.

एप्रिल-डिसेंबर 2019 मध्ये रॉयल एनफील्डने एकूण 533089 बाइक्सची विक्री केली होती. देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास एप्रिल ते डिसेंबर 2020 या काळात बाइक्सची विक्री 23 टक्क्यांनी कमी झाली. त्या तुलनेत मागील वर्षी याच काळात 501541 यूनिटची विक्री केली.

यापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये रॉयल एनफील्डच्या एकूण विक्रीत 6 टक्क्यांनी वाढ झाली होती. देशांतर्गत बाजारात कंपनीने नोव्हेंबरमध्ये 59,084 बाइक्सची विक्री केली, तर नोव्हेंबर 2019 मध्ये 58,292 वाहनांची विक्री झाली होती.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here