काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याने केला सवाल; ‘त्या’ 2 पक्षांच्या मागे का लागत नाही ईडी?

मुंबई :

सध्या ईडी ही भाजपची संस्था असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. अशातच आता ‘एमआयएम, वंचित’च्या मागे ईडी का लागत नाही?’, असा सवाल मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एमआयएम आणि वंचितच्या मागे ईडी, सीबीआय का लागत नाही. या पक्षांमुळं भाजपाला फायदा होतो. हे पक्ष काँग्रेसची मतं खातात आणि भाजपला निवडून देतात. निवडून आल्यानंतर भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरवितो, असा आरोपही त्यांनी केला.

संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो असं मोदी सांगतात. भाषणात डॉ. आंबेडकरांचं नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत, असेही पुढे बोलताना गायकवाड यांनी सांगितले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here