बाटलीबंद पाणी विकणार्‍या ‘या’ व्यक्तीने टाकले मुकेश अंबांनींनाही मागे; वाचा, काय आहे विषय

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून असलेली रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांची ओळख आता संपली आहे.  loomberg बिलिओनाईरेस निर्देशांकानुसार आता चिनी व्यापारी झोंग शशान (hong Shanshan ) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. यासह ते जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंतही ठरले आहेत.

झोंग हे बाटलीबंद पाणी आणि कोरोना लस यासारख्या व्यवसायांशी संबंधित आहे. त्याचा व्यवसाय पत्रकारिता, मशरूम लागवड आणि आरोग्यापर्यंत विस्तारला आहे. त्यांची एकूण संपत्ती यावर्षी 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 अब्ज डॉलरवर गेली आहे.

इतक्या वेगाने एखाद्याच्या संपत्तीत वाढ करण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. झोंग शन्शन यांनी इतकी मोठी झेप घेतली आहे की त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि चीनचा सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिबाबाचा जॅक मा यांनाही मागे टकले आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती यावर्षी 18 अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि ते 76.9 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर पोहोचले आहेत.

‘लोन वुल्फ़’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या झोंग आणि त्यांची कंपनी सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. विविध व्यवसायात यश मिळवणार्‍या या व्यक्तीने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ति होण्याचा बहुमान मिळवला आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here